📞 विनामूल्य मार्गदर्शन · मराठी 🔐 प्रशासन प्रवेश अभ्यागत: ३,२०९
सहकार संवाद सहकार संवाद अनुभवातून मिळालेले ज्ञान... समाजाच्या उपयोगासाठी!

मोकळा भूखंड / न वापरलेला फ्लॅट आणि मासिक देखभाल शुल्क - कायदेशीर विश्लेषण

                                                           “सहकार संवाद” Series - लेख क्र. 4

“समाजात जागरूकता निर्माण करण्याच्या या प्रवासात जेथून ज्ञान आणि प्रेरणा मिळते, त्या प्रत्येक स्रोताचे मनापासून आभार.”

✍️ लेखक : श्री.सुनिल शेलार, सहकार व कृषि क्षेत्रातील अभ्यासक

प्रस्तावना : दोन वेगळे कायदे - दोन वेगळ्या पद्धती

महाराष्ट्रातील मालमत्ता व्यवस्थापनाची रचना दोन वेगवेगळ्या कायदेशीर चौकटींवर उभी आहे: सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट ओनरशिप व्यवस्था : हे दोन्ही कायदे महाराष्ट्रातील शहरीकरण, सामुहिक निवास पद्धती आणि नागरी जीवनाच्या शिस्तबद्ध नियोजनाचे दोन मूलस्तंभ आहेत. दोन्ही कायदे स्वतंत्र असून त्यांची रचना, उद्दिष्टे आणि व्यवस्थापन तत्त्वे वेगवेगळी आहेत.

“दोन्ही कायदे सामूहिक व्यवस्थापन व समान योगदानाच्या संकल्पनेवर आधारित असले तरी, सहकारी संस्थांमध्ये निर्णय प्रक्रिया ‘लोकशाही पद्धती’ने होते, तर अपार्टमेंट व्यवस्थेत निर्णय ‘Declarations व Bye-laws’ द्वारे नियंत्रित होतो.” परंतु या दोन्ही कायद्यांचा केंद्रबिंदू एकच आहे, सामूहिक हिताचे संरक्षण, सुविधांची सातत्याने उपलब्धता आणि सुव्यवस्थित सामुहिक निवास संस्कृतीची जपणूक.

या दोन्ही कायद्यांमध्ये

·         निवास प्रकल्पाचे व्यवस्थापन,

·         सदस्यांचे हक्क व जबाबदाऱ्या,

·         व्यवस्थापक समितीचे दायित्व,

·         सामायिक सुविधांचा वापर,

·         आणि त्या सुविधांच्या नियमित देखभाल खर्चाची मांडणी

हे सर्व मुद्दे अत्यंत स्पष्टपणे व पारदर्शकतेने विशद केलेले आहेत.

गृहनिर्माण संस्था असो वा अपार्टमेंट ओनरशिप प्रणाली ; व्यवस्थापक समिती आणि सदस्य हे दोन्ही घटक एकाच धाग्याने बांधलेले आहेत - सहकार्य, शिस्त, उत्तरदायित्व आणि सामूहिक जीवनाचे भान.”

आजच्या घडीला वाढती शहरी लोकसंख्या, बदलते कौटुंबिक नमुने, वाढते उंच इमारती प्रकल्प आणि सामायिक सुविधांवरील वाढते अवलंबित्व यामुळे देखभाल शुल्काचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. म्हणूनच या दोन्ही कायद्यांमध्ये “जागा वापरली किंवा नाही” यावर आधारित शुल्क नाकारण्याचे दावे कायदेशीर कसोटीवर टिकतात किंवा नाही, हे सत्रनिहाय स्पष्ट केले जाणे गरजेचे आहे. याच कारणास्तव हा लेख दोन स्वतंत्र सत्रांमध्ये मांडला जात आहे—

·         सत्र १ : महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 (MCS Act, 1960) (CHS)

·         सत्र २ : महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी अधिनियम, 1970 (MAOA, 1970)

यामुळे वाचकांना दोन्ही कायद्यांचे स्वरूप, तफावत, जबाबदाऱ्या, व्यवहारातील लागू प्रक्रिया आणि न्यायालयीन समज स्पष्ट व सुबोधपणे समजेल.

 सत्र क्रमांक १ ; सहकारी गृहनिर्माण संस्था (CHS) 

भाग 1/5 : समस्या :

१. “मी मोकळ्या भूखंडावर राहात नाही, मग मी शुल्क का द्यावं?”

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये वारंवार असा दावा एैकण्यास येतो की,

·         “माझा भूखंड मोकळा आहे.”

·         “मी फ्लॅट वापरत नाही.”

·         “मी तिथे राहत नाही.”

·         “भूखंडावर बांधकाम केले नाही, त्यामुळे देखभाल शुल्क लावू नये.”

हे दावे अनेकदा अज्ञानातून किंवा गैरसमजातून केले जातात. सहकारी कायद्यामध्ये या घटकांचा आणि देखभाल शुल्क आकारणीचा कोणताही संबंध येत नाही. कारण, देखभाल शुल्क हे नेहमीच सदस्यत्वाच्या आधारे आकारले जाते, वापराच्या आधारे नव्हे, हे अनेक न्यायालयीन निर्णयांनीही स्पष्ट करून दिले आहे.

यापुढे, आपण या लेखातून अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्पष्ट करणार आहोत ;

अशा स्वरूपाचे दावे प्रत्यक्षात सहकार कायदा, उपनियम आणि मा. न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांच्या कसोटीवर टिकतात का? की हे केवळ अज्ञानातून किंवा भ्रमातून केलेले दावे आहेत?

या लेखाचा उद्देश कोणत्याही सदस्याविरुद्ध भूमिका घेणे नसून, सहकारभावनेतून संस्थेतील आर्थिक सुव्यवस्था आणि सामूहिक शिस्त टिकवणे आणि याच बरोबर व्यवस्थापन समिती आणि सदस्य या दोन्ही स्तरांवरील हा सामान्य गैरसमज दूर करणे असा आहे. यामुळे ;

·         संस्थेचे आर्थिक व्यवस्थापन अधिक पारदर्शक राहील,

·         अनावश्यक वाद-विवाद टळतील,

·         निर्णय प्रक्रियेला गती मिळेल,

·         आणि संस्थेचे एकूण कामकाज सुरळीत, सुसूत्र आणि गतिमान होण्यास थेट मदत मिळेल.


2. सहकारी संस्थेचे मूलतत्त्व : सदस्यत्व = दायित्व

सहकारी गृहनिर्माण संस्थेत प्रवेश घेतल्याबरोबर (भाग दाखला स्विकृत केल्या नंतर) सदस्य दोन मूलभूत दायित्वांशी बांधील होतो:

१) संस्थेच्या व्यवस्थापन खर्चाचा वाटा उचलणे - (कलम 79, 79A - व्यवस्थापनाची सात्यत्ता)

२) सामाईक सुविधा व सामान्य जागांची नियमित देखभाल

उदा. सुरक्षा व्यवस्था, पानी लाईन, परिसर स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, कार्यालयीन भाडे, सभांचा खर्च, कार्यालयीन खर्च, रस्ते/पथदिवे, कंपाऊंड इ.
हे सर्व कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य खर्च आहेत.

यामुळे “सदस्यत्व” = “देखभाल शुल्क भरण्याची कायदेशीर जबाबदारी”. 

सदस्य वापर करतो की नाही, हे अप्रासंगिक आहे.

 

3. “वापर” आणि “सदस्यत्व” यातील मूलभूत फरक

वापर (Occupancy) = व्यक्तिगत निर्णय

       राहणे किंवा न राहणे, बांधकाम करणे किंवा न करणे हे सदस्याचे वैयक्तिक निर्णय.

सदस्यत्व (Membership = Ownership) = कायदेशीर दायित्व

      सदस्यत्व कायम असेल तर कायदेशीर दायित्व कधीही संपत नाही.

हे दोन वेगवेगळे विषय आहेत. म्हणून:

“मी राहत नाही, वापरत नाही, भुखंड मोकळा आहे म्हणून मी शुल्क भरत नाही”
हे विधान कायदेशीरदृष्ट्या शून्य आणि अमान्य ठरते.

सरळ सूत्र (Golden Rule) : “सहकारी संस्थेत देखभाल शुल्क हे ‘वापर शुल्क’ नसून ‘सामाईक खर्चाचा वाटा’ आहे.” हा तत्त्व MCS Act, 1960 च्या मूलभूत हेतूस अनुरूप आहे.


4. वापर नसल्याने शुल्क न देणे = संस्थेच्या कार्यात अडथळा

एका सदस्याने शुल्क भरला नाही, तर बाकी सर्व सदस्यांवर भार वाढतो. यामुळे ;

·         संस्थेचा वार्षिक अर्थसंकल्प बिघडतो

·         सामाईक सुविधा बिघडतात

·         देणीदार वाढतात

·         सेवा खंडित होतात

याला MCS Act मध्ये व्यवस्थापनातील अडथळा (Obstruction) मानले गेले आहे, आणि त्यावर ठोस तरतुदी आहेत.

भाग 2 / 5 :  सहकारी संस्था : कायदेशीर चौकट, कलमे, आणि शुल्क आकारणीचे तत्त्व

5. कायदेशीर चौकट : MCS Act, Rules, आणि Model Bye-laws

सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये शुल्क आकारणीची पायाभूत चौकट तीन स्तरांवर आधारित आहे:

(A) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 (MCS Act)

(B) महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, 1961 (MCS Rules)

(C) Model Bye-laws of Co-operative Housing Societies, 2014/2021

ही तीनही एकत्र मिळून मासिक देखभाल शुल्कांचे स्वरूप ‘अनिवार्य’ करतात.


6. महत्वाच्या कायदेशीर तरतुदी

(1) MCS Act, 1960 - कलम 79 आणि 79A, व्यवस्थापनाचा खर्च वाट्यात घेण्याचे दायित्व : या कलमांनुसार, संस्थेला तिचे नियमित खर्च (administrative + maintenance) उचलण्यासाठी सर्व सदस्यांना सामाईकपणे योगदान देणे बंधनकारक आहे.

येथे “राहतो की नाही, माझे बांधकाम नाही” हे अप्रासंगिक आहे.
दायित्व सदस्यत्वावर आधारित आहे.


(2) MCS Act - कलम 68

सदस्याकडून शुल्क वसूल करण्याचा अधिकार, या कलमात संस्था प्रत्येक सदस्याकडून अनुज्ञेय वसूल करू शकते, जरी:

·         सदस्य भुखंडा वापर करत नसेल

·         फ्लॅट / भुखंडा रिकामा असेल

·         भूखंड मोकळा ठेवला असेल

·         बांधकाम केलेले नसेल

शुल्क न भरणे = वैध देणेदार (Defaulter).


(3) MCS Rules, 1961 - नियम 90 : सामाईक खर्चाचा वाटा अनिवार्य

नियम 90 मध्ये स्पष्ट म्हटले आहे की, सहकारी संस्थेच्या सामूहिक कार्यासाठी आवश्यक सर्व खर्च ही संस्थेची वैधानिक जबाबदारी असून, त्या खर्चाचा वाटा सदस्यावर टाकणे कायदेशीर आहे.


(4) Model Bye-laws 2014 / 2021 - Bye-law No. 67

मासिक देखभाल शुल्कामध्ये समाविष्ट असणारे प्रमुख घटक:

सामान्य स्वच्छता, परिसर रखरखाव, सुरक्षा, बाग, कंपाऊंड, पाणी पंप / मोटर, पथदिवे, विद्युत खर्च, कर्मचारी वेतन, लेखा / कायदेशीर व्यय, सामान्य दुरुस्ती, विमा प्रीमियम ( संस्था निहाय सामायिक सुविधांचे स्वरूप भिन्न असु शकते.)

या सर्व सुविधा ‘वापर आधारित’ नाहीत, त्या संपूर्ण संस्थेच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच शुल्क सदस्यत्वावर आधारित आहे.


(5) Bye-law No. 65 - कायदेशीर दस्तऐवज

दिलेल्या अटींनुसार, संस्था सदस्याकडून आकारू शकते:

·         Maintenance charges

·         Property tax share

·         Non-occupancy charges

·         Water charges

·         Service charges

एकही ठिकाणी “वास्तवता नसल्यास शुल्क माफ” अशी सवलत नाही.

 

७. कायदेशीर तत्त्व : “No Member Can Opt Out”

सहकारी कायदा सामूहिकतेवर उभा आहे. एक सदस्य आपल्या मनाने खालील गोष्टी टाळू शकत नाही:

·         देखभाल शुल्क

·         सामान्य खर्च

·         सामायिक सेवा

·         संस्थेची आर्थिक जबाबदारी

यालाच न्यायशास्त्रात म्हणतात: Collective Responsibility Doctrine

= सामूहिक सुविधा टिकवण्यासाठी प्रत्येक सदस्याने योगदान देणे बंधनकारक.


8. “मी राहात नाही / बांधकाम नाही” हा दावा कायदेशीरदृष्ट्या निराधार का?

कारण १ : दायित्व ‘Ownership/Membership’ वर आधारित असते, रहिवासावर नाही.

कारण २ : संस्थेच्या सेवा सतत चालू राहतात, उदा. पंप, सुरक्षा, लाईट, परिसर स्वच्छता इ.; आपला वापर असो वा नसो.

कारण ३ : सामुदायिक खर्च हा वैयक्तिक निवडीवर अवलंबून नसतो

कारण ४ : रिकामा फ्लॅट किंवा मोकळा भूखंडही संस्थेच्या सीमेत आहे, त्याच्या सुरक्षेचा, सीमारेषेचा, पाण्याच्या पुरवठ्याचा खर्च संस्थेलाच करावा लागतो.

कारण ५ : “Usage-based waiver” या संकल्पनेला कायद्यात जागा नाही.


9. महत्त्वाची कायदेशीर नोंद :

“देखभाल शुल्क = संस्थेच्या अस्तित्वाचा खर्च” हा संस्थेतील प्रत्येक सदस्याने, बांधकाम नसलं, रिकामा फ्लॅट असला, वापर नसला तरी ही ; भराणे गरजेचे आहे.

हेच न्यायालयांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.

भाग 3 / 5 : न्यायालयीन निर्णय : “मोकळा भूखंड / रिकामा फ्लॅट असला तरी देखभाल शुल्क अनिवार्य”

1) सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली (1987)

प्रकरण : Nahalchand Laloochand Pvt. Ltd. vs. Panchali Co-op Hsg Society

दाव्याचे स्वरूप: फ्लॅट विकसकाने दावा केला की, “सदस्य तो वापरत नाही, म्हणजे शुल्क लावणे ग्राह्य नाही.”

निर्णय:

·         सोसायटीकडील “सामाईक सेवा” सर्व सदस्यांसाठी आहेत.

·     वापर नसलात तरी, “सदस्य हा त्याच्या फ्लॅटचा, परिसराचा आणि सामुदायिक व्यवस्थेचा लाभार्थी आहे.”

तात्पर्य: सर्वोच्च न्यायालयाने प्रथमच स्पष्ट केले की,

सहकारी संकल्पना = समान योगदान.

वापर = गौण विषय.

 

2) मा. उच्च न्यायालय, मुंबई (2014)

प्रकरण : Juhu Vile Parle Development Co-op. Housing Society Ltd. vs. MCGM

दाव्याचे स्वरूप: “मी फ्लॅट रिकामा ठेवला आहे. मी पाणी/कचरा/सुरक्षा वापरत नाही.
म्हणून शुल्क लावू नये.”

निर्णय:

·         “रिकामा फ्लॅट देखील सोसायटीच्या इमारतीच्या सुरक्षिततेचा आणि रचनात्मक स्थैर्याचा लाभ घेतो.”

·         “कायद्याने वापर नसेल तर शुल्क माफ होईल असा कोणताही प्रावधान नाही.”

तात्पर्य: हा निर्णय सांगतो की, सदस्यांचा वापर असो वा नसो, इमारत ही एक एकक (Single Structural Unit) आहे. एककाच्या देखभालीचा खर्च सर्वांनी उचलायचा.

 

3) मा. उच्च न्यायालय, मुंबई (2018)

प्रकरण : Ramkrishna Co-op Hsg Society vs. Member (प्रेस संदर्भ)

दाव्याचे स्वरूप: भूखंडधारक सदस्य म्हणाले, “माझा भूखंड मोकळा आहे.
मी बांधकाम केलेले नाही. म्हणून देखभाल शुल्क लागू नाही.”

निर्णय:

·         “भूखंड हा संस्थेच्या सीमारेषेत असल्याने त्याच्या सुरक्षेचा, रस्त्याचा, पाण्याचा खर्च सामाईक ठरतो.”

·         “भूखंड मोकळा ठेवणे हा सदस्याचा वैयक्तिक निर्णय आहे. संस्थेच्या खर्चातून सूट देण्याचे कारण नाही.”

तात्पर्य: या निर्णयाने मोकळ्या भूखंड विषयावर शिक्कामोर्तब केले की,
रिकामा भूखंड असो वा बांधलेला — Maintenance अनिवार्य.

 

4) सर्वोच्च न्यायालय (2020)

प्रकरण : Apartment Owners Association vs. Builder

दाव्याचे स्वरूप: “आम्ही फ्लॅट ‘उपयोगात आणलेला नाही’ म्हणजे मेंटेनन्स लागू नये.”

निर्णय:

·         “Maintenance = Shared Utility Cost.”

o    इमारत वापरली गेली नाही तरी, लिफ्ट, कॉरिडॉर, सिक्युरिटी, जनरल पॉवर, स्ट्रक्चर सुरक्षा इ. हे सर्व सुविधा चालूच असतात.

तात्पर्य: या निर्णयाने दोन्ही व्यवस्थांमध्ये (CHS + Apartment) वापर नसल्यास मेंटेनन्स माफ नाही हा तत्त्व पुनःश्च अधोरेखित केला.

 

5) मा. उच्च न्यायालय, मुंबई (2009)

प्रकरण : प्रेस रिपोर्ट (बातमीचा मुख्य संदर्भ — Times Property, 02/08/2009)

दाव्याचे स्वरूप: सदस्याचा दावा — “मी फ्लॅटमध्ये राहत नाही. वापर करत नाही. त्यामुळे देखभाल शुल्क आकारणे अन्यायकारक आहे.”

न्यायालयाचा निर्णय:

·         “देखभाल शुल्क हे ‘वास्तवता’ किंवा ‘वापर’ यावर आधारित नाही.”

·         “सदस्यत्व टिकत असेपर्यंत सामाईक खर्चाचा वाटा उचलणे बंधनकारक आहे.”

·         “रिकामा फ्लॅट असला तरी देणेकरी ठरतो.”

तात्पर्य: यातून स्पष्ट होतं की,
रिकामा फ्लॅट = देखभाल शुल्कापासून सूट नाही.
देखभाल शुल्क = सामुदायिक सेवांचा खर्च.

भाग 4 / 5 : What’s App Group (Official Communication Channel)

10. WhatsApp गट : “सामाईक सुविधा” म्हणून कायदेशीर ओळख

आज बहुसंख्य गृहनिर्माण संस्था WhatsApp Official Group चा वापर करतात:

·         तात्काळ संदेश, सूचना, पाणीपुरवठा / वीज माहिती, आपत्कालीन संपर्क, सर्वसाधारण सभेच्या नोटिस, व्यवस्थापन सूचना, आर्थिक मागण्या, सुरक्षा अलर्ट, कायदेशीर नोटिसांची माहिती

ही सुविधा अधिकृत संप्रेषण यंत्रणा (Official Communication Infrastructure) म्हणून मान्य केली जात आहे. अनेक जिल्हा सहनिबंधकांनीही (oral directives + circular-style notices) संस्थांना “WhatsApp group communication” स्वीकारण्यास प्रोत्साहन दिले आहे.

त्यामुळे WhatsApp गट हा “सामुदायिक सुविधा (Common Service)” च्या व्याख्येत येतो.

आणि जो सदस्य सामाईक सुविधा घेणार, त्याने त्याचा वाटा (maintenance) भरावाच लागतो.


१1. देखभाल न भरल्यास WhatsApp सुविधेवर निर्बंध - कायदेशीर वा असंवैधानिक?

कायद्याची भूमिका:

·         Model Bye-laws 166 मध्ये “Defaulter Member” च्या हक्कांवर निर्बंध देण्याची तरतूद आहे.

·         विशेषतः  मतदान, पदाधिकाऱ्यांचे निवडणूक, आणि सामान्य सुविधांची अंशतः मर्यादा.

WhatsApp गट यामध्ये कुठे बसतो?

WhatsApp हा “संचार सुविधा” आहे.

संस्था स्वतःचा “Digital Infrastructure” सांभाळते.

Defaulter सदस्यांना सुविधांचे निर्बंध लागू करू शकते.

त्यामुळे,

“मेंटेनन्स न भरणाऱ्या सदस्याला अधिकृत WhatsApp गटातून तात्पुरती वगळणे”
हे कायदेशीर, तर्कसंगत आणि Management’s Right आहे.

(हे विशेषतः न्यायालयीन पूर्वनिवाड्यांतील “Access to common amenities may be restricted for defaulters” या तत्त्वाशी सुसंगत आहे.)

 

१2. Non-Occupancy Charges (NOC) आणि Maintenance - दोन्ही वेगळे

अनेक सदस्य चुकीने मानतात की, “मी तिथे राहत नाही, म्हणून माझ्यावर Non-Occupancy Charges लागू नयेत. किंवा Non-occupancy लागू नाही = Maintenance लागू नाही.” हे पूर्णपणे चुकीचे आहे.

Non-Occupancy = ‘वास्तवता नसल्याचा शुल्क’

Maintenance = ‘सामाईक सेवा चालू ठेवण्याचा खर्च’

या दोन गोष्टी या कायदेशीरदृष्ट्या भिन्न आहेत.

🔸 फ्लॅट मोकळा आहे Non-occupancy लागू नसेल, पण

🔸 Maintenance 100% लागूच

का?, कारण Maintenance सेवा वापर नसतानाही अखंड चालू असतात.

 

१3. सदस्य Defaulter झाल्यास संस्थेचे ठोस अधिकार

(1) Recovery Certificate (RC) मिळवणे - कलम 101

सह. निबंधक RC देतात थेट बँक/पगारातून वसुली होते.

(2) व्याज आकारणे (उशीर शुल्क)

Bye-law No. 71 नुसार 21% वार्षिक मर्यादेत.

(3) सेवांवर मर्यादा

- WhatsApp समूहातून वगळणे
- पार्किंग सुविधा रोखणे
- सामाईक सोयींचा अंशतः वापर रोखणे
(पाणी व वीज यावर मात्र प्रतिबंध नाही - कारण ते मानवी हक्कांशी संबंधित आहेत.)

(4) मतदानाचा अधिकार काढणे

Bye-law 118 नुसार Defaulter सदस्य “अयोग्य” (Ineligible).

(5) कायदेशीर नोटीस व वसुली खर्च लावणे

सर्व खर्च Defaulter सदस्यावर टाकणे - पूर्णत: वैध.

 

विशेष मुद्दा - मोकळा भूखंड / बांधकाम नसलेला प्लॉट (Plot Owner), मोकळा प्लॉट असला तरी:  सुरक्षा, प्रवेश रस्ते, पाणी लाईन, कंपाऊंड, स्ट्रीट लाईट, सामान्य देखभाल, मॅनहोल / ड्रेनेज, हे सर्व त्या प्लॉटला संस्थेकडूनच पुरवले जातात. म्हणून:  

मोकळा प्लॉट = सामाईक सुविधांचा लाभार्थी, म्हणून Maintenance अनिवार्य.

 

१4. संस्था आणि सदस्य याचे नाते ‘भाडेकरू व मालक’ असे नसून "सह-मालक व सह-व्यवस्थापक" असे आहे

सदस्य:

·         संस्थेचा मालक आहे

·         व्यवस्थापनात भागीदार आहे

·         सेवांचे लाभार्थी आहेत

·         संस्थेच्या बजेटचे भागीदार आहेत

या नात्यात "मी वापरत नाही / बांधकाम केले नाही" हा तर्क ग्राह्य नाही.

भाग 5 / 5 : तात्पर्य, निष्कर्ष

१८. तात्पर्य : ‘वापर नसणे’ हा शुल्क न भरण्याचा कायदेशीर आधार नाही

वर दिलेल्या सर्व कायदेशीर तरतुदी, नियम, न्यायालयीन निर्णय आणि तज्ञांच्या निवेदनांवरून पुढील निष्कर्ष एकमताने उभे राहतात:

१) देखभाल शुल्क हे Usage-based नसून Membership-based आहे.

२) रिकामा फ्लॅट / मोकळा प्लॉट असला तरी सदस्य सामाईक सुविधांचा लाभ घेतो.

३) संस्थेच्या सेवा कोणत्याही परिस्थितीत थांबत नाहीत, त्या अखंड चालू ठेवण्यासाठी खर्च सतत लागतो.

४) वापर नसल्याचा दावा केवळ “वैयक्तिक निर्णय” आहे, मात्र संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनावर त्याचा परिणाम होऊ शकत नाही.

५) “मी वापरत नाही मी देत नाही, हा तर्क कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरवला गेला आहे.

६) WhatsApp समूहासारख्या आधुनिक डिजिटल सुविधा ‘सामाईक सेवा’ आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी सदस्याने नियमित दायित्व पाळणे बंधनकारक आहे.

७) संस्थेला देणीदारावर (Defaulter) कठोर कारवाई करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार आहे.

Summary

वापर नाही = शुल्क नाही चुकीचे.

सदस्यत्व = शुल्क भरण्याचे कायदेशीर दायित्व बरोबर.

 

19. निष्कर्ष : सहकारी संस्थेचे बळ म्हणजे “सर्व सदस्यांची सामूहिक जबाबदारी”

सहकारी गृहनिर्माण संस्था ही केवळ वैयक्तिक मालमत्ता न राहता सामूहिक जीवनव्यवस्थेची रचना आहे. वैयक्तिक निवडी, राहणीमान, वास्तव्य — हे सर्व दुय्यम आहेत. प्राथमिक आहे:

·         संस्थेचा अर्थसंकल्प

·         सुविधांची सततता

·         सुरक्षितता

·         रचना स्थैर्य

·         सामुदायिक व्यवस्थापन

·         समान योगदान

म्हणूनच, प्रत्येक सदस्याने, वापर असो वा नसो ; संस्थेच्या नियमित देखभाल शुल्कात स्वतःचा वाटा उचलणे हीच सहकाराची खरी भावना आहे.

आजच्या शहरी जीवनात सामुहिक सुविधा, सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सोयी आणि व्यवस्थापनाची शिस्त यांना जी गरज आहे, ती फक्त नियमित देखभाल शुल्कानेच पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ; वाद निर्माण करण्याऐवजी, सदस्यांनी सामूहिक हित, सहकारभाव आणि संस्थेच्या प्रगतीला प्राधान्य देणे, हीच खरी मार्गदर्शक दिशा आहे.

स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडत, सकारात्मक सहभागातून “सहकारातून सामूहिक विकास” ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे, हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य व संस्थेच्या प्रगतीचे खरे रहस्य आहे.

💬 :  !! सदस्यत्व हा हक्क नसून जबाबदारीही आहे; आणि जबाबदारीचे पालन केले तरच हक्क टिकतात !!

सुलभ संदर्भ :

१) Hon. Supreme Court : Nahalchand Laloochand Pvt Ltd vs Panchali Co-op Hsg So. (2010)

२) Hon. Bombay High Court - Juhu Vile Parle Development CHS vs MCGM (2014)

३) Supreme Court - Apartment Owners Association vs Builder (2020)

4) Maharashtra Apartment Ownership Act_ HC Clarifies Charges.pdf

५) Society Maintenance Charges_ Supreme Court's Decision.pdf

६) Maintenance fee for empty plots and villas in single layout.pdf

७) Society Maintenance Charges In 2025 (Detailed Overview).docx

8) Times Property, दिनांक : 02/08/2009 : Vacant Flat Still Liable for Maintenance — Bombay High Court Observation

9) Lokmat Real Estate Supplement, वर्ष : 2018 : Plot Owners Cannot Avoid Maintenance in Layout Societies

10) Ipleaders Legal Blog Article (2021-2023) : https://blog.ipleaders.in/supreme-court-judgments-society-maintenance-charges/

11) महाराष्ट्र टाईम्स, विषय : Non-occupancy charges vs maintenance clarification

7. Disclosure / कॉपीराईट सूचना

हा लेख शैक्षणिक, संदर्भात्मक आणि प्रबोधनात्मक हेतूसाठी तयार करण्यात आला आहे. लेखाचा हेतू केवळ माहितीपर आणि शैक्षणिक असून, तो कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा शासकीय यंत्रणेविरुद्ध आरोप अथवा मतप्रदर्शन म्हणून ग्राह्य धरू नये. यातील सर्व विचार, विवेचन आणि कायदेशीर विश्लेषण हे उपलब्ध अधिनियम, नियम, न्यायालयीन निवाडे आणि लेखकाशी संबंधित वैयक्तिक अभ्यासाच्या आधारे सादर करण्यात आले आहेत. या लेखातील विवेचन हे सर्वसाधारण मार्गदर्शनासाठी असून, वाचकांनी आपल्या विशिष्ट प्रकरणासंबंधी सल्ल्यासाठी तज्ज्ञ अथवा अधिकृत कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घ्यावा. लेखक आणि “सहकार संवाद” या व्यासपीठाकडून लेखातील माहितीच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणामाची जबाबदारी स्वीकारली जाणार नाही.

कॉपीराईट सूचना :

या लेखातील संपूर्ण मजकूर, स्वरूप आणि मांडणी यावर लेखकाचे सर्वाधिकार (Copyright ©) राखीव आहेत. लेखाचा कोणताही भाग — मुद्रित, डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून — लेखकाच्या लेखी संमतीशिवाय पुनरुत्पादित, प्रकाशीत, प्रसारित किंवा वापर करू नये.

लेखातील कोणत्याही भागाबद्दल शंका असल्यास किंवा विशिष्ट माहितीचा उपयोग संस्थात्मक उद्देशाने करावयाचा असल्यास, वाचकांनी थेट लेखक / संपादकांशी संपर्क साधावा.

लेखातील विधाने ही संदर्भाधारित असून, ती कोणत्याही संस्थेच्या अधिकृत भूमिकेचे प्रतिनिधित्व करत नाहीत. या लेखाचा हेतू केवळ कायदेशीर जागरूकता वाढविणे आणि सहकारी क्षेत्रातील वस्तुनिष्ठ समज दृढ करणे हाच आहे.

-------------- *********************--------------


← सर्व लेख यावर सल्ला विचारा

अलीकडील लेख